चाकूर येथे व्हि एस पँथर्स युवा संघटनचे रक्तदान शिबिर
८७ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात योगदान दिले
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) व्हि.एस.पँथर युवा संघटना चाकुरच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन चाकुर शहरामध्ये करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरांमध्ये युवकांनी रक्तदान करुन आपले कर्तव्य पार पाडले.कोरोना माहामारीमुळे लातुर जिल्हात रक्त साठ राहावे म्हणून रक्तपेढीच्या वतीने रक्तदान करण्यांचे आव्हान करण्यात आले आहे.त्या आव्हानांस प्रतिसाद देत चाकुर शहरामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. करोनाच्या महामारीमुळे देशालाच नव्हे तर सर्व जगाला या रोगाने पछाडले आहे. तरी या रोगाचे खूप मोठ्या प्रमाणात सात वाढत असल्याने रक्तपेटी मध्ये रक्ताचा तुतोडा भासत असल्याने या सर्व गोष्टी निदर्शनास घेऊन सतत सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारी सामाजिक संघटना व्ही एस पँथर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्य तालुका शाखा चाकूरच्या वतीने यापुर्वी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले आहेत.बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावे म्हणून रोजगार मेळावा,निराधर,दिव्यांग व्यक्तीना शासनाच्या योजना मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन निराधार मेळावा घेऊन त्यांचे प्रस्ताव जागेवरच भरुन घेऊन त्याच्या पगारी चालु करणे,अश्या विविध सामाजिक कामात योगदान देणारी ही सामाजिक संघटना आहे.आज कोरोनामुळे रक्त साठ सहज उपलब्ध व्हावे म्हणून दि. २.९.२०२० वार बुधवार रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होतो या शिबिरास ८७ युवकांनी रक्तदान देऊन मानुस्कीची नाळ जपली आहे. या रक्तदान शिबिरांचे उदघाटन चाकूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड व ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय आधिक्षक अधिकारी डॉ. दिपक लांडे यानी केले आहे. यावेळी उपोनि खंडु दर्शने, प्रथम नगर अध्यक्ष मिलिंद महालिंगे जयहिंद अकडिमि संचालक चंद्रकांत कसबे कस्ट्रिब ता. अध्यक्ष माधव कांबळे, भालचंद्र ब्लड बँक चे डॉ. किशोर पवार, व त्यांची सर्व रक्त पेढीचे कर्मचारी .व्ही. एस. पँथर्स चाकूर तालुका अध्यक्ष शरद किणीकर यांच्या नेतृत्वाखाली संघटना अनेक समाज उपयोगी कार्यक्रम तालुक्यात राबवत आहे. यावेळी तालुका अध्यक्ष शरद किणीकर यानी रक्तदान शिबिरच्या वेळी राष्ट्रीय संत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पन करण्यात आली. सर्व रक्तदात्याचे अभिनंदन केले डॉ.दिपक लांडे सखोल असे मार्गदर्शन केले व या पोलीस निरीक्षक जयवंतराव चव्हाण यानी भेट देऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्याचे अभिनंदन करून राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान दिल्या बदल शुभेच्छा दिल्या.वेळी तालुका अध्यक्ष शरद भाऊ किणीकर ग्रुप ता.अध्यक्ष अजय वाघमारे ता. सचिव अजय शृंगारे शहर अध्यक्ष विक्रम कांबळे उपाध्यक्ष बंटी भोसले विध्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ किणीकर , शादूल शेख, शकील तांबोळी, इस्माईल पठाण, संगम डोंगरे ,मिलिंद कांबळे, विष्णु अर्जुने, अनुज कांबळे,अश्विन शिंदे आदी उपस्थित होते.
0 Comments