Latest News

6/recent/ticker-posts

औसा शहरातील हद्दवाढ क्षेत्रातील "ओपन स्पेस" चा घेतला जाणार ताबा यासह अनेक ठराव मंजूर

औसा शहरातील हद्दवाढ क्षेत्रातील "ओपन स्पेस" चा घेतला जाणार ताबा यासह अनेक ठराव मंजूर

लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख)दि.१३ - औसा नगरपालिकेने आज मोठे धाडसी विषय ठरावात घेऊन त्यांना मंजुरी दिली. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या हद्दवाढ क्षेत्रातील "ओपन स्पेस" (खुल्या जागा) चा ताबा घेण्याचा विषय ठेवून तो सर्वांनुमते पास करण्यात आला. या ठरावाने हद्दीबाहेरील अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले आहे. कारण वाढीव क्षेत्रातील नगर रचनाकारांच्या लेआउट नुसार ज्या जागा खेळण्यासाठी,बागेसाठी किंवा जिम साठी खुल्या सोडण्यात आल्या आहेत अशा जागा कांही मुळ मालकांनी विकल्याची चर्चा शहरात आहे. तसेच ज्या रुंदीचे रस्ते नगररचनाकारांनी  मंजूर केले आहेत यापैकी बऱ्याच रस्ता असलेल्या जागेचीही विक्री झाल्याचे शहरात बोलले जात आहे. पालिकेच्या या ठरावाने जमीन मालकांच्या पायाखालची वाळू सरकण्याचे चिन्हे आहे. अनेक दिवसांपासून हद्दवाढ ही समस्या औकरांसाठी ऐरणीचा विषय होता. अफसर शेख यांच्या काळामध्ये त्यांच्या प्रयत्नाने हा निर्णय झाल्याने त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. आज झालेल्या विशेष सभेमध्ये हा ठराव घेउन परत अफसर शेख हे चर्चेत आले आहेत. यावरील ठरावा सह छत्रपती शिवाजी महाराज प्रदर्शनी मराठा भवनास मान्यता, भव्य वारकरी भवनला मान्यता, माकणी औसा पाईपलाईन करिता निधी उभारण्यासाठी मान्यता, उर्वरित गाळे फेरलिलाव, नवीन विकास कामे, तिसरा टप्पा तात्पुरता डांबरीकरणास सह भूसंपादनास पाठपुरावा, मागासवर्गीय समशान भूमी विकसित करणे असे अनेक ठराव आज झालेल्या विशेष सभेमध्ये घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments