लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दर्पण पुरस्कारासाठी आवाहन
लातूर:(प्रतिनिधी) लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पत्रकाराना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. याहीवर्षी सदरील कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सदर पुरस्कार पाच विभागात देण्यात येणार असून यात संपादकीय, शोधपत्रकारिता, उत्कृष्ट दिवाळी विशेषांक, इलेक्ट्रॉनिक मिडियासाठी उत्कृष्ट वार्तांकन अशा स्वरूपात पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी संबंधित पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका तीन प्रतीत लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मध्यवर्ती कार्यालय, पत्रकार भवन लातूर येथे १० जानेवारीपर्यंत जमा कराव्यात, असे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष न.पा. घोणे व सचिव सचिन मिटकरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments