लोकसहभातून तयार झालेले लातूर जिल्ह्यातील पहिले हायटेक कार्यालय
कासार बालकुंदा:{ प्रतिनिधी/मारुती लोहार} तांबाळा येथील जि.प.शाळेचे हायटेक कार्यालय- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेले लातूर जिल्ह्यातील शेवटचे गाव.कर्नाटक संस्कृतीचा प्रभाव असलेले महाराष्ट्रातील गाव. गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असून १८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लोकसहभागामुळे या शाळेच्या अनेक गरजा पूर्ण झाल्या आहेत,होत आहेत. लोकसहभागासाठी हे जिल्ह्यातील आदर्श गाव आहे. गावकरी आपापल्या क्षमतेप्रमाणे सहकार्य करत असतात 'सुंदर माझे कार्यालय' उपक्रमांतर्गत गावक-यांनी जि.प.शाळेचे कार्यालय हायटेक करण्याचा संकल्प केला. निलंगा तालुक्याचे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते व गट शिक्षणाधिकारी संतोष स्वामी यांच्या प्रेरणेने,शिक्षण विस्तार अधिकारी गुरुलिंग स्वामी,हल्लाळी केंद्राचे केंद्र प्रमुख दिगंबर माचेवाड यांच्या मार्गदर्शनाने,शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने,गट साधन व्यक्तींच्या सल्ल्याने व शाळेचे मुख्याध्यापक दयानंद मठपती,सह शिक्षक नामदेव चोले,दामोधर मोहारे,लक्ष्मण चापाले,श्रीमंत संगनाळे,संतोष वाघमारे यांच्या अथक परिश्रमातून हे हायटेक कार्यालय तयार झालेले आहे.कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली असून कारपेट वापरण्यात आलेले आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष व सचिव यांना बसण्यासाठी व्हील चेअर घेण्यात आलेल्या आहेत.पालक व सदस्यांना बसण्यासाठी वीस दर्जेदार फायबर खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.वेळ दिनांक व तापमान दाखवणारी डिजिटल घड्याळ कार्यालयात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.कार्यालयात अत्यावश्यक असलेली देणगीदारांची (दात्यांची यादी),सर्व समित्या,शिक्षक माहितीदर्शक तक्ता,शाळेचे वेळापञक इ. माहिती फ्लेक्स बोर्ड करुन डकविण्यात आली आहे.दारे व खिडक्यांना सुंदर,आकर्षक पडदे व थंड हवेसाठी दोन हायटेक पंखे बसविण्यात आले आहेत. एल.ई.डी. बल्ब व ट्युबमुळे लख्ख प्रकाशात कार्यालय न्हाऊन निघत आहे.कार्यालयाच्या दर्शनी भागात महामानवांच्या फोटो दिमाखात उभ्या आहेत.कार्यालयात मुख्याध्यापकासाठी दर्जेदार फर्निचरचा वापर करण्यात आला आहे. कार्यालयात दर्जेदार कंपनीचे संगणक,प्रिंटर-स्कँनर,साउंड सिस्टीम बसविण्यात आले आहे. तांबाळा येथील दानशूर गावक-यांमुळे हे हायटेक कार्यालय आकारास आले आहे.त्यांच्याच सहकार्यातून 'सुंदर माझे कार्यालय' उपक्रमातील राहिलेल्या बाबी पूर्ण करण्यासाठी जि.प.शाळेची टीम अथक परिश्रम घेत आहे. तांबाळा जि.प.शाळेचे हे हायटेक कार्यालय म्हणजे 'लोक सहभागातून तयार झालेले लातूर जिल्ह्यातील पहिलेच आदर्श उदाहरण आहे.लातूरपासून १०० कि.मी.अंतरावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसलेल्या या गावाने लातूर जिल्ह्यात 'लोक सहभागासाठी' आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
0 Comments