Latest News

6/recent/ticker-posts

मास्कचा वापर करा अन्यथा 200 रु दंड- ग्रामपंचायत कार्यालय धानोरा

मास्कचा वापर करा अन्यथा 200 रु दंड- ग्रामपंचायत कार्यालय धानोरा


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, जिल्ह्यात तालुक्यासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाने थैमान घातले असून ग्रामीण भागात मात्र खुलेआमपणे नागरिक फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. गल्लीबोळात अनेक लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात मागील 2 दिवसांत 10 जणांचा मूर्त्यु झाला आहे तरी पण लोकांना यांचं भान नाही लोक खुले आम फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्याची परिस्थितीचा विचार करता दवाखान्यात बेड उपलब्ध नाहीत पूर्ण दवाखाना हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र नागरिकांना लॉकडाऊन नसल्यासारखे वाटत आहे. धानोरा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की मास्क चा वापर करा अन्यथा 200 रु दंड, विनाकारण घराच्या बाहेर फिरू नका. पाच जण एका ठिकाणी बसण्यास मनाई आहे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायजर चा वापर करा असे आवाहन सरपंच सौ.अरुणा जाधव व ग्रामसेवक त्रिभुवन लामतुरे व सर्व ग्रामपंचायत सदस्याद्वारे करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments