Latest News

6/recent/ticker-posts

पक्षांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन झाडावर केली पाणपोईची सोय

पक्षांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन झाडावर केली पाणपोईची सोय


पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांचा पुढाकार

प्रशांत तांबोळकर 

शिरूरअनंतपाळ : उन्हाचे चटके बसु लागल्याने पक्षांची पाण्याच्या शोधासाठी होणारी भटकंती पाहुन शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी स्वखर्चातुन मातीची भांडी खरेदी करून शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनच्या परिसरातील झाडावर टांगली आहेत . दररोज त्यामध्ये पाणी ठेवत असल्यामुळे पक्षांची किलबिलाट ऐकावयास मिळत आहे. उन्हाळा सुरु झाला की प्रत्येक जन उन्हाच्या काहीलीने हैराण होतो. उन्हाचा सर्वाधीक ञास पक्षांना होतो. झाडाला असलेल्या घरट्यातील पिलांचा सांभाळ करण्यासाठी पक्षांचा आटापीटा सुरु असतो. बहुतांश वेळेला खायला अन्न मिळेल परंतु इवल्याशा चोंचीने पाण्याचे छोटे छोटे घोट घेण्यासाठी पक्षांना खुप ञास होतो. पक्षांचा होणारा हा ञास पाहुण पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी स्वखर्चातुन मातीची मडकी खरेदी करून ती पोलिस स्टेशनच्या परिसरातील निलगीरी, गुलमोहराच्या एकुण एक्कवीस झाडावर टांगुन त्यामध्ये दररोज सकाळ दुपार व संध्याकाळ या तीनवेळी पाणी टाकण्याची सोय केली आहे. मातीच्या मडकीमध्ये थंड पाण्याची सोय झाल्यामुळे पक्षी आनंदात पाणी पीत आहेत. पाण्यामुळे पोलिस स्टेशन परिसरात पक्षांचा किलबिलाट ऐकावयास मिळत आहे.

पाणी येळणीत टाका.

विविध कामाच्या निमित्ताने ग्रामिण भागातुन आलेल्या नागरिकांने सोबत आणलेले  शिल्लक पाणी टाकुन न देता झाडास बांधलेल्या मातीच्या यळणीत टाकावे असे आवाहान पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments