Latest News

6/recent/ticker-posts

वॉर्डातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करा - नगरसेवक नाईकवाडे

वॉर्डातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करा - नगरसेवक नाईकवाडे


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. 2 इनामवाडी येथील जवळपास प्रत्येक घरात कोरोनाबाधीत आढळून येत आहे. गावात कोरोनाने दोघांचा मृत्यु झाला आहे. नगर परिषदेने तातडीने प्रत्येकाची सक्तीने चाचणी करावी व कोवीड पॉझीटिव्ह रूग्णावर उपचार करावेत अन्यथा मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देईन व समाजातील नागरिकांच्या तीव्र आंदोलन करेन असा इशारा नगरसेवक विकास नाईकवाडे यांनी मुख्याधिकाऱ्यास दिलेल्या पत्रात दिला आहे. गावामध्ये कोरोनाबाधीतांची संख्या वाढली आहे. यामुळे संपूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावालाच कंटेनमेंट झोन घोषीत करून प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची सक्तीने चाचणी करावी, गावातील 45 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. प्रत्येकाची सक्तीने चाचणी केली नाही तर आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ असेही त्यांनी मुख्याधिकाऱ्यास दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments