लातूर जिल्ह्यात मागील तीन दिवसात 50 मृत्य
लातूर:(जिमाका) दि.19 - जिल्ह्यात पोर्टलवर एकूण तीन दिवसात 50 मृत्यू अपलोड केलेले असल्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या 934 एवढी झालेली आहे. दिनांक 18 एप्रिल 2021 रोजी एका दिवसात एकूण 50 मृत्यू झालेले नसून ते तीन दिवसात झालेले आहेत. आणि त्याची स्थिती पूढील प्रमाणे आहे. दिनांक 16 एप्रिल 2021 रोजी 13 मृत्यू झाले. दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी 26 मृत्यू व 18 एप्रिल 2021 रोजी 11 मृत्यू झाले असे एकूण 3 दिवसात 50 मृत्यूंची नोंद झाली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक लातूर यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.

0 Comments