गाव पुढा-याच्या मनावर आला होता ताण,पुन्हा आठवला मागील दहा वर्षाचा मान
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे) औसा तालुक्यातील भादा येथील गाव पुढाऱ्याच्या मनावर आला होता ताण परंतु मागील दहा वर्षाचा गावकऱ्यांनी दिलेला त्यांना दिलेला आठवला पालत्वचा मान म्हणून चालू झाले भादा विकासाचे प्रमाण अशाच पद्धतीचे भादा येथील समस्येबाबत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण गेल्या दहा वर्षांमध्ये गाव पुढारी तथा उपसरपंच बालाजी शिंदे यांच्या विरोधात आतापर्यंत कोणत्याही तालुका किंवा जिल्हा कार्यालयाकडे तोंडी किंवा लेखी कसल्याच प्रकारची तक्रार गेलेली नव्हती यामुळे बालाजी शिंदे यांचा प्रशासकीय कार्यालयात मोठा आदरार्थी दबदबा निर्माण झाला होता तो दबदबा मागील काही दिवसांपूर्वी भादा येथून दिलेल्या तक्रारीमुळे सर्व नामशेष झाला? असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असून बालाजी शिंदे यांनीही या तक्रारीमुळे गाव विकासाकडे ऐन अडचणीच्या काळात अक्षम्य दुर्लक्ष केले होते याचा परिणाम म्हणून मागील एक महिन्यापासून गावातील अनेक भागात पाण्याची समस्या मोठया प्रमाणात निर्माण झाली होती परंतु त्यांचे मन आणि गावाबाबतचे मत परिवर्तन होऊन सध्या गावाला पाणी कशाही पद्धतीने पुरवठा करण्याचे त्यांनी वृत्त हाती घेतले असून विविध भागात स्वतः जाऊन ते पाणी पुरवत असून पाणीपुरवठा सुरळीत आणि मुबलक होतोय की नाही?याबाबतही वैयक्तिक त्या भागात जाऊन लक्ष देत नागरिकांशी चर्चा करीत असल्याची चर्चा गावांमध्ये आहे. सध्या या कोरोना सारख्या महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीतही" वन मॅन आर्मी"अशा प्रकारे गावच्या समस्या बाबत ते काम करत आहेत तर अनेकवेळा या गाव पुढाऱ्यांच्या बाबतीत वैयक्तिक गुत्तेदारींचे काम आगदी चोख आणि वेळेवर केले जात असून या गुत्तेदारीमुळे गाव विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असल्याची चर्चा असून वैयक्तिक काम किंवा लाभ याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी गावात चर्चा सुरू आहे. तेव्हा वैक्तिक लाभ नागरिकांना कसा मिळेल याबाबत पदाने उपसरपंच अधिकार, सेवा, कार्य, निर्णय, नियोजन, आयोजन, खर्चाचे प्रयोजन यांमानाने ते सरपंच आहेत यामुळे पूर्वीच्या काळी एक अनुभवी नारीकाचे बोल आहेत की, स्त्री हट्ट,बाल हट्ट आणि राज हट्ट याच्यापुढे कोणाचेही चालत नाही याचा प्रत्यय सध्या गावात होणाऱ्या अनेक कामावरून नागरिकांना अनुभवायला येत आहे. कारण सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर बंद,गेल्या चार वर्षांपासून एकही वैयक्तिक सिंचन विहीर नाही,गावात कोणीही कुठेही अतिक्रमण करतोय,ग्राम पंचायत किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था बाबत कोणताच नागरीक गंभीर्यने घेत नाही,अशी आवस्था भादा गावाची झाली आहे. तर सध्या गावाला पाणीपूरवठा सुरळीत व्हावा यासाठी उपसरपंच बालाजी शिंदे स्वतः उन्हाची किंवा इतर गोष्टीची तमा न बाळगता पाणी पुरवठा नियोजनात दिसून येत असून गावात सुरळीत पाणी पूर्वठाचे नियोजन जोरदार सुरु आहे.
0 Comments