चाकुर तालुक्यातील कोविड रुग्णांनसाठी 5 व्हेंटिलेटर व आरोग्य अधिकारी यांचा स्टॉप उपलब्ध करण्याची मागणी
बालाजी पाटील चाकुरकर यांची,माजी अर्थमंञी सुधीर मुनगुंटीवर कडे भ्रमणध्वनी वर मागणी
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस झपाट्याने कोरोनांचा फैलाव होत आहे. रुग्णांना वेळ उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत असुन अतिगंभीर रुग्णांना उपचारासाठी लातुर किंवा उदगीरला पाठवले जात आहे. तेथे बेड व अॉक्सिजन उपलब्ध होत नाहीत. खाजगी दवाखाने खचाखाच भरले असुन सामान्य लोकांना खर्च पडवणार कसा ? तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी यांचा स्टॉप नाही. अपुरी साधन सामुग्री असल्यामुळे तालुक्यात मृत्यू दर वाढला आहे. अशा भितीदायक वातावरणात सध्या रुग्ण व नातेवाईक उपचारांसाठी वनवण फिरत आहेत.वेळे वर जर आॉक्सिजन मिळेले असते तर कादाचित रुग्णांचे प्राण वाचले असते. असा नातेवाईकाडुन माहिती मिळाली. बालाजी पाटील यांनी महाराष्ट्र राज्यांचे माजी अर्थमंञी सुधीर मुनगुंटीवर यांच्याकडे भ्रमणध्वनी वर चाकुर तालुक्यात कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी 5 व्हेंटिलेटर, 10 अॉक्सिजन कॉन्सन्ट्रेटर,एम.डी.फिशीशीयन,भुलतज्ञ,नर्स इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.तसेच रेमडीसिव्हर इंजेक्शनही उपलब्ध करुन घ्यावे अशी मागणी केली,या मागणीची तात्काळ दखल देऊन माजी मंञी सुधीर मुनगंटीवर यांनी पाठपुरावा केला.राज्यांचे आरोग्य मंञी राजेश टोंपे यांना मागणी केली.चाकुर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.शासकीय कोविड सेंटरला सुविधेअभावि रुग्णांचा प्रचंड हाल होत आहे.तरी तेथे लागणारे सर्व आरोग्य सुवाधा देण्यात यावी व याकडे लक्ष देऊन त्वरीत कार्यावाही करण्यात यावी अशी विनंती आरोग्य मंञी राजेश टोंपे यांच्याकडे पञाव्दारा केली. आमच्या मागणीचा विचार व्हावा असे पञ व्यवहार केले.लातुर जिल्हाधिकारी यांनाही पञाव्दारे मागणी केली. बालाजी पाटील यांच्या मागणीमुळे येणाऱ्या काळात चाकुर तालुक्यात कोविड रुग्णांसाठी आरोग्य सुविधा लवकरच मिळणार आहेत व चाकुर तालुक्यातील आरोग्य सेवेतील प्रश्न तातडीने सुटणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

0 Comments