नळेगाव ग्रामपंचायत येथे आढावा बैठक
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) नळेगाव येथील ग्रामपंचायत सभागृह येथे कोरोना संसर्ग रोखण्या संदर्भात चाकूर तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नळेगाव येथे ग्रह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्याकडे ग्रामपंचायत ने उर्दू शाळा नळेगाव येथे विलगीकरण कक्ष स्थापन करावे,तसेच ग्रह विलगीकरण असतानाही बाहेर फिरणाऱ्या लोकांमुळे वाढत असलेला कोरोना संसर्ग प्रसार टाळता यावा आणि आशा ताईंनी गावातील 18 ते 45 वर्षावरील नागरिकांची यादी तयार करून यामध्ये लासीकरण करून घेतलेले व ज्या लोकांचे लसीकरण राहिले आहे अश्या लोकांची यादी तयार करण्यात यावी असे बिडवे यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक सुनील शिंगे,तलाठी अविनाश पवार उपसरपंच रवी शिरुरे,ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत चव्हाण,श्याम मुंजाने,उमाकांत सावंत,दगडू सावळकर,अशफाक मुजावर,शमीम कोतवाल,कावेरी गाडेकर आदी उपस्थित होते. नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाने 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण होणार असल्याने आरोग्य प्रशासनावर अधिक ताण पडण्याची शक्यता असल्याने यासाठी आरोग्य प्रशासनास मदत करण्यासाठी अतिरिक्त 4 शिक्षकांची नियुक्ती तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने जे व्यापारी ,दुकानावर,हॉटेल चालक यांना ठरवून दिलेल्या कडक निर्बंधांचे जे पालन करणार नाहीत अश्यांवर दंडात्मक कार्यवाही व जे वारंवार नियम मोडत असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे असे आदेश तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या कडून देण्यात आले.
0 Comments