घरोघरी जाऊन शरीरातील ऑक्सिजन माञा तपासणी
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} सध्य महाराष्ट्र राज्यात व लातुर जिल्ह्यात कोरोनांने उच्चांक गाठला आहे.चाकुर तालुक्यात ग्रामीण भागातही कोरोनांचा प्रादुर्भाव वाढत आहे.आदर्श गावा म्हणून ज्यांची ओळख आहे.अलगरवाडी गावामध्ये कोरोनांचा शिरखाव होऊ नये म्हणून अलगरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवित आहे.अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवुन गावातील नागरिकांना सोयी सुविधा,नागरिकांच्या आरोग्य काळजी घेत असते.सर्व रोग निधान आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.अलगरवाडी गावामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरात जाऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असताना जिल्ह्यातील आदर्श गाव अलगरवाडीने आदर्सश सरपंच गोविंद माकणे यांच्या संकल्पनेतुन सद्य परिस्थितीत ग्रामपंचायतीचे कर्तव्य लक्षात घेवुन घरोघरी जावुन प्रत्येकाचे शारीरिक तापमान व शरीरातील आॕक्सिजन माञा तपासण्याचा उपक्रमआजपासुन सुरु केला. अलगरवाडी गावांचे ग्रामसेवक प्रशांत राजे स्वतःजातीने गावातील नागरिकांची तपासणी केली. याप्रसंगी उपसरपंच सौ. अनुजा संगमेश्वर पटणे, ग्रा.पं. सदस्य सौ. वैशाली विकास स्वामी, राम सांगवे , ग्रामसेवक प्रशांत राजे, आशा कार्यकर्ती सौ. मिनाक्षी खरोसे व कर्मचारी विनायक पारसे हे उपस्थित राहुन जातीने लक्ष ठेवुन सर्वांची तपासणी करत आहेत. या तपासणी वेळी आदर्श गावचे सरपंच गोविंद माकणे यांनी गावातील नागरिकांनी आपली व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,मास्कचा वापर करावा,सामाजिक अंतर ठेवावा,आपले हात साबणांने सतत धुवावे,यासुञांचा वापर करुन कोरोना पासुन बचाव करावा.लसीकरण करुन घ्यावे दोन्हीही लसीचे डोस वेळेवर घ्यावे असे आहवान सरपंच गोविंद माकणे यांनी केले.

0 Comments