जल जीवन मिशन अंतर्गत माळेगाव कल्याणी येथे नवीन पिण्याच्या टाकीचे अभियंत्याकडून सर्वेक्षण
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी येथील नवीन पिण्याच्या पाण्याची टाकी व विहीर खोलीकरण याचे सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषद अभियंता यांनी आज रविवारी माळेगाव गावांमध्ये येऊन तांत्रिक बाबीचे सर्वेक्षण केले. गावाला पाणीदार बनवण्यासाठी गावातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी गावांमध्ये नवीन योजना राबविण्यात येत आहे गावातील नवीन वस्तीत पाईपलाईन कनेक्शन ही योजना पुढील दोन महिन्यात राबविण्यात येणार आहे त्यामुळे नवीन वस्तीतील पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. विहिरीचे खोलीकरण करण्यात येणार आहे त्या सर्व तांत्रिक बाबी चे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता टेंकाळे यांनी आज गावांमध्ये येऊन तांत्रिक बाबीचे सर्वेक्षण व मोजमाप केले यावेळी गावचे सरपंच भीम पोस्ते,उपसरपंच बळीराम मिरखले,दीपक ढविले,व्यंकट पाटील, करण भाटगावे, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या होत असलेल्या योजनेमुळे माळेगाव गावाचा पाण्याचा प्रश्न लवकरच कायमचा मिटणार आहे.
0 Comments