बलात्कार प्रकरणातील फरार असलेला आरोपीस अखेर पोलिसांकडून अटक
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शेडोळ बलात्कार प्रकरणातील फरार असलेला आरोपी अक्रम जिब्राईल पठाण वय 26 राहणार शेडोळ हा गुन्हा केल्यानंतर फरार होता त्याचा शोध निलंगा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे टीम घेत होती सदर आरोपी हा एरंडी सारोळा शिवारात असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी या आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी निलंगा पोलीस स्टेशन च्या ताब्यात त्याला दिले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतजी जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजाभाऊ मस्के ,नितीन कटारे ,युसुफ शेख यांनी केली आहे. या आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन निलंगा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 92 / 2021 कलम 376 377 504 506 भादवी ,4,7,8,12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

0 Comments