Latest News

6/recent/ticker-posts

14 एप्रिलला उपजिल्हा रुग्णालयांमध्ये महारक्तदान शिबीर करून बाबासाहेबांची जयंती साजरी होणार

14 एप्रिलला उपजिल्हा रुग्णालयांमध्ये महारक्तदान शिबीर करून बाबासाहेबांची जयंती साजरी होणार


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त  14 एप्रिल रोजी निलंगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे  महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील जनतेने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रक्तदान करून साजरी करुया या संकल्पनेतून याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र मध्ये कोणाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे त्यामुळे रक्त संकलन करावे असे आवाहन त्यांनी केले त्याला प्रतिसाद म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी निलंगा शहरातील व तालुक्यातील जनतेने रक्तदानास प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. रक्तदान शिबिराचे आयोजक वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे जी , डॉ.शेषराव शिंदेजी, डॉ. प्रल्हाद साळुंकेजी , डॉ.उद्धव जाधवजी , रजनीकांत कांबळेजी , अंकुश ढेरेजी , मेघराज जेवळीकरजी, रामलिंग पटसाळगेजी , एम.एम जाधव सर, उत्तम शेळकेजी , परमेश्वर शिंदेजी , अनिल अग्रवालजी , विनोद सोनवणेजी , सुबोध गाडीवान जी यांनी जनतेला रक्तदानासाठी यावे असे आवाहन करून मास्क व सोशल डिस्टन्स ठेवावा अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments