आष्टागाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
नळेगाव: (प्रतिनिधी बाळासाहेब बरचे) दि.11 - चाकूर तालुक्यातील आष्टागाव परिसरात आज दुपारच्या सुमारास वादळी वारा व गारांचा पाऊस होऊन आंबा,चिंच,व द्राक्ष बागांसह गहू,ज्वारी,हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर काही भागात विद्दुत पुरवठा विस्कळीत झाला होता. आष्टागाव परिसरात या पावसामुळे रबी ज्वारी,हरभरा,गहू व आंब्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी कोलमडला आहे.
0 Comments