Latest News

6/recent/ticker-posts

फळांचा राजा आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर; तालुक्यात आमराई सापडणे झाले दुर्मिळ

फळांचा राजा आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर; तालुक्यात आमराई सापडणे झाले दुर्मिळ


बि डी उबाळे

पूर्वी आमराई म्हणजे प्रतिष्ठेच्या समजली जायची शेतीचा उल्लेख आता आला की आमराई विषय आवर्जून उल्लेख व्हायचा शेतात किंवा बांधावर तसेच विहिरीजवळ गोलाकार किंवा रांगेत आंब्याची झाडे असायची या झाडांच्या बांधीत ही वैविध्य असायचे आंब्याचे झाड इतर झाडांपेक्षा उंच व विस्ताराने मोठे असते उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरूंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसासाठी ही याचा फायदा होतो हावेने ,वादळाने हे झाड पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो.

लातूर: औसा-एकेकाळी फळांचा राजा असलेल्या आंबा या फळाची आमराई शेतात असणे म्हणजे ग्रामीण भागात मोठ्या प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जायचे. कालांतराने शेतकऱ्यांना परंपरागत शेती परवडत नसल्याने त्यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत शेतीमध्ये मोसंबी, चिकू ,डाळिंब अशा विविध फळबागा,फुलशेती यांची जोड करत शेती सुजलाम- सुफलाम केली.  मात्र हे करीत असताना पूर्वी चार चौघात आमच्याकडे आमराई आहे असे गर्वाने सांगणारे बागायतदार शेतकऱ्यांचे आमराईकडे स्पेशल दुर्लक्ष झाले आहे. परिणामी आज घडलेल्या परिसरातील सर्व आमराई नष्ट झाल्या असून आज घडीला आमराई मधील एखादे झाड त्या जागी उभे आहे. 

     


  तर काही ठिकाणी असलेल्या आमराईचा हा अनमोल ठेवा जतन न झाल्यास भावी पिढीला हा ठेवा पहावयास मिळणार नाही. औसा तालुक्यात बोटावर मोजण्याइतक्या आमराई शिल्लक राहिलेल्या असून मोडकळीस आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडाची लागवड होणे आवश्‍यक आहे. परंतु अलीकडे आंब्याची झाडे सर्रास तोडली जात असल्याने गावागावातील आमराई नामशेष होत चालल्या आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. या आमराई वृक्षतोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. भारतीय संस्कृतीत आमृवृक्षाचे महत्त्व फार पूर्वीपासून आहे.कोकिळेला आवडतं गाणं गाण्यासाठी परावृत्त करणार आश्रयस्थान वैशाखाच्या तळपणारया उन्हापासून माणसासह विविध पशुपक्ष्यांना मायेची सावली देणारं झाड म्हणून आंब्याच्या वृक्षाकडे पाहिले जाते आपल्या पूर्वजांनी लावलेल्या अनेक आंब्याच्या जाती आजही आपण चाखत आहोत आमराईच्या रूपात येणार्‍या पिढ्यांसाठी लावलेली असंख्य झाडे म्हणजे त्यांचा दूरदर्शीपणाच.

Post a Comment

0 Comments