दररोज वाढत असलेली आकडेवारी चिंताजनक,प्रशासनाला सहकार्य करावे
चाकुर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी- विलासराव पाटील,कॉग्रेस पार्टी चाकुर तालुकाध्यक्ष
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोनांचा कहर सध्या चाकुर तालुक्यात चालु आहे.ग्रामीण भागात कोरोनांचा शिरकाव झाला आहे.दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस कोरोना बांधित रुग्णात वाढच होत आहे.तरी चाकुर तालुक्यातील व चाकुर शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान विलास पाटील चाकुकर यांनी केले. चाकुर तालुक्यात मागील कांही दिवसापासुन कोरोना बांधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढु लागली असुन लिंबाडवाडी गावात जवळपास शंभरच्या पार गेलेले पाहावयास मिळाले. दिवसागणिक वाढणारे आकडे चिंताजनक असुन याकडे गांभीर्याने पाहण्याची व नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे विलास पाटील यांनी म्हटले आहे. यासाठी आरोग्य विभाग व तहसिल प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. परंतु या सगळ्या प्रयत्नांना चाकुर तालुक्यातील व चाकुर शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करुन व आवश्यक काळजी घेऊन सहकार्य करणे व प्रशासनास पाठबळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चाकुर तालुक्यात कोरोना संसर्गाची साखळीत तोडण्याच्या उद्देशाने शासनाच्या कडक निर्बध घातले आहेत. लसीकरणासाठी पाञ असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे ज्यांनी लसीचे पहिले डोस घेऊन विहित वेळ पुर्ण केली आहे, त्यांनी लसीचे दुसरे डोस घ्यावेत असे आहावान विलास पाटील यांनी केले. सर्वत्र आरोग्य दुत आपले प्राण पणाला लावुन कोरोना परिस्थितीशी लढा देत आहेत. चाकुर शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करावे,मास्कचे वापर करावे,सानिटायझरचे वापर करावे,सामाजिक अंतर ठेवावा,साबणाने सतत आपले हात धुवावे,तसेच पाञ असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आहवान केले.चाकुर शहरातील सर्वच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व नियमपाळा कोरोनाला हरवा आपली व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.

0 Comments