ब्रेक द चैन ला औसेकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रा. बी. जी. शेख
औसा:दि.10 - औसा शहरांमध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवार व रविवार या दोन दिवशी संपुर्ण लॉकडाउन असल्याने शहरात आज अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद होती. शहरातील मुख्य चौकामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. औसा पालिकेची भूमिका सुरुवातीपासूनच लाॅकडाऊन च्या समर्थनात होती. कारण या ठिकाणी कोरोना रुग्न आढळून येत होते. शासनाच्या या निर्णयामुळे काहीअंशी फरक दिसेल अशी आशा आहे. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील लोकांची इच्छा अशी होती की आमच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील ? हा प्रश्न घेऊन अनेक जण आपल्या घरामध्ये बंद होते.
0 Comments