नळेगाव येथे सर्व बाजारपेठा कडकडीत बंद
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) दि1. 0 राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून नळेगाव येथील बाजारपेठ आज व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवली. आज नळेगाव येथील बस स्थानक व आठवडी बाजार,मेन रोड वरील दुकाने,सराफ मार्केट व तसेच येथील उपबाजारपेठेत (आडत लाईन) दुकाने कडकडीत बंद दिसून आली. तसेच लिंबाळवाडी येथील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच रहा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

0 Comments