Latest News

6/recent/ticker-posts

रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले;तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांची कार्यत्तपरता

रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले;तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांची कार्यत्तपरता


चाकुर:(तालुका प्रतिनिधी/सलीम भाई तांबोळी) चाकुरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे संध्याकाळी पाच वाजता लिंबाडवाडी गावाकडे जात असताना घरणी आणि लातुररोड जवळ पेट्रोल पंपाजवळ तहसिलदार यांची गाडी आली असता.रस्त्यावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसला त्या व्यक्तीचा मोटरसायकल अपघात झाला होता.तो अपघातग्रस्त व्यक्तीला जबर मार लागला होता.डोक्यातून त्याच्या रक्त निघत होता.अशा प्रसंगी डॉ.शिवानंद बिडवे यांनी प्रथम आपली कार्यत्तपरता दाखवली.अपघाग्रस्त व्यक्तीसाठी दवाखान्यातील अॕम्बुलेन्सची वाट नपाहता आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये त्या व्यक्तीला बसवून ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे उपचारासाठी सोबत कर्मचारी विशाल लंगोटे यांना पाठवुन दिले. त्या व्यक्ती वर वेळेवर दवाखान्यात पाठवल्यामुळे उपचार झाले. डोक्यात मार लागल्यामुळे तो जखमी झाला होता. त्यांचे प्राण वाचले.चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांच्या कार्यत्तपरते मुळे एका व्यक्तीचे जीव वाचले चाकुर तालुक्यात सध्या कोरोनांची लाट वाढत आहे.महसुल यंञणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली राञदिवस काम करीत आहे.लिंबाडवाडी मध्ये कोरोनांचा कहरच झाला आहे.दोन तीन दिवसांत शंभरच्या पार गेली असल्यामुळे डॉ.बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशाननांने अनेक तातडीचे उपाययोजना केली आहे.विलगिकरण,गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना तपासणी करुन बांधित रुग्णांवर उपचार चालु आहेत.

Post a Comment

0 Comments