पंचायत समिती निलंगा रोजगार हमी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी सिध्देश्वर बिराजदार
शिरोळ वांजरवाडा:( प्रतिनिधी/सलीम पठाण) पंचायत समिती निलंगा रोजगार हमी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी बसपुर येथील सिध्देश्वर बिराजदार यांची निवड झाल्याबद्दल शिरोळ (वां.) ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सिध्देश्वर बिराजदार म्हणाले की मनरेगा असो की पंचायत स्तरावरील कुठलीही योजना असो ती शिरोळ वांजरवाडा आणी आसपासच्या सर्व गावात प्रत्येक विकासाची योजना आणण्याचा पुर्णपणे प्रयत्न करुन परिसरातील गावाचा विकास पुर्ण करण्यास बांधिल आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रसाद जाधव, नवाज तांबोळी, काशिराम जाधव, दिपक पुंडे, किशोर जाधव, किरण जाधव, सलीमभाई पठाण उपस्थित होते.
0 Comments