भादा येथे विविध सामाजीक उपक्रमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)आज बुधवार दि 14 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वा आधार प्रतिष्ठान भादा कडून सामाजीक उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी उपस्थित नागरिकास मास्क, सॅनिटायजर, बाबसाहेबच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले,तर कोरोनची वाढती संख्या लक्षात घेता नागरिक निरोगी रहावे यासाठी 24 तास सानिटायजर आणि स्टँड ग्रामपंचायत भादा येथे एक आणि अनंदनगर,शिवाजी नगर अशा विविध भागात चार ठिकाणी सॅनिटायजर व स्टँड उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, रास्त भाव दुकान यांना दुकांनामध्ये जाऊन मास्क,सॅन टायजर देण्यात आले.
यावेळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आर आर पाटील,बी डी उबाळे,दीपक मानधने,प्रशांत पाटील,मनोज पाटील,रियाज खोजे,मनोज उबाळे,लखन लटूरे सह सरपंच मिनाबाई दरेकर,उपसरपंच बालाजी शिंदे,ग्रा प सदस्य अमोल पाटील,सूर्यकांत उबाळे,योगेश लतुरे,आणि गांवकरी उपस्थित होते.
0 Comments