Latest News

6/recent/ticker-posts

आत्माराम बनसोडे यांच्यातर्फे पालिकेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट

आत्माराम बनसोडे यांच्यातर्फे पालिकेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट 


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)औसा  नगरपालिका /नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे औसा तालुका अध्यक्ष आत्माराम हरिबा बनसोडे यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अफसर शेख व मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचा सत्कार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा औसा पालिकेस भेट देण्यात आली. आंबेडकरांचे सच्चे अनुयायी उपासक आत्माराम बनसोडे औसा नगरपालिकेतून  सेवानिवृत्त झाल्यानंतरही हा अनोखा उपक्रम त्यांनी राबविला असून ज्या महामानवामुळे माणूस म्हणून ओळख झाली त्याचीच प्रतिमा या नगर पालिकेमध्ये नसल्याचा खेद व्यक्त न करता आपल्या कमाईतून हा भव्य आणि सुंदर अशी प्रतिमा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी भेट देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments