Latest News

6/recent/ticker-posts

सामाजिक बांधिलकी जपत संचारबंदीचे नियम पाळा- अजिक्य रणदिवे मुख्याधिकारी न.प.चाकुर

सामाजिक बांधिलकी जपत संचारबंदीचे नियम पाळा- अजिक्य रणदिवे मुख्याधिकारी न.प.चाकुर


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} सध्या कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू केला आहे. या अनुषंगाने शासन आणि प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांसाठी नियमावली बनवली असुन आवश्यक त्या सुचना केलेल्या आहेत. या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. जेणेकरुन प्रत्येक नागरिकांचे, त्यांच्या कुटुंबीयाचे आणि पर्यायाने समाजाचे हीत होईल.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढीची साखळी तुटेल.असे आहवान चाकुरचे नगरपंचायचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी केले आहे.सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असुन दिवसेंदिवस प्रमाणही वाढत आहे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जनतेच्या हिताचा विचार करुन केवळ नाईलाज म्हणून संचारबंदी आणि निर्बंध लादले गेले आहेत. आपल्या भागातुन कायम लॉकडाऊन लागु होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांने अत्यंत सजगपणे परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन वागावे. जेणेकरुन स्वतःच्या व समाजाच्या आरोग्याचे रक्षण होईल. प्रशासनालाही कठोर पावले उचलण्याची वेळ येणार नाही. प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. मास्क चा वापर नियमित करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शारीरिक अंतर ठेवुन वागावे,नियमित हात धुवावे असेही आहवान अजिक्य रणदिवे यांनी केले. होम कोरंटाईन झालेल्या लोकांनी 14 ते 17 दिवस सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ नये. वास्तविक पाहता सात आठ दिवसात त्या लोकांना आराम वाटु लागला तर ते पॉझिटिव्ह पेशंट लगेच बाहेर फिरु लागले आहेत अशी चर्चा आहे. हे अत्यंत चुकीचे असुन कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट 12 ते 14 दिवस सामान्य निरोगी व्यक्तीस संसर्ग पसरवु शकतो.याचे गांभीर्य लक्षात घ्यावे,मी आता बरा आहे.मला काहीच ञास नाही.माझ्या कोणतीच लक्षणे नाहीत.मला दमा लागत नाही असे कारणे सांगुन पाच सात दिवसांतच घराबाहेर पडुन स्प्रेडरची भुमिका बजाऊ नये.शासनाच्या सुचनांचे पालन करुन होम कोरंटाईन झालेल्या लोकांनी शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

Post a Comment

0 Comments