Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा पोलीस प्रशासनाच्या वतीने निलंगा वासीयांना भावनिक आवाहन

निलंगा पोलीस प्रशासनाच्या वतीने निलंगा वासीयांना भावनिक आवाहन


निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण निलंगा शहरात व गल्लो-गल्ली मोटार सायकल वर रॅली काढून नागरिकांना भावनिक आवाहन करण्यात आले. कोरोना या महामारीच्या काळात शहरातील कोणीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, स्वतःची व आपल्या सुरक्षित कुटुंबाची आपण काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे भावनिक आवाहन निलंगा पोलिसांच्या वतीने करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, पोलीस अधिकारी, व पोलीस कर्मचारी याचा सहभाग होता तसेच गल्लोगलीत रॅलीद्वारे निदर्शनास आलेली चालू दुकानांवर कारवाईचा बडगा उगारून 8000 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.



Post a Comment

0 Comments