औसा तालुक्यातील खंडेराव भंडारे गुरुजी आंबेडकरी चळवळीचे एक सच्चे पाईक
(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)
औसा तालुक्यातील बोरगाव(न) येथील रहिवाशी आणि सुशिक्षित शिक्षक यामुळे अन्यायाविरुद्ध लढणे हाच त्यांचा मानवतावाद आज त्यांच्या जन्मदिनानिमित आंबेडकरी जंनतेसह मानवतावादी,समता, बंधुता,न्याय प्रिय नागरीकाकडून विनम्र अभिवादन! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन गुरुजी म्हणून ज्ञानार्जनाचे काम करत होते. शाळेतील शिक्षक म्हणून तसेच समाजाक कार्य करत राहिले त्यांच्या कार्याची ओळख आजपर्यंत लोकांच्या मनामनात ध्यानात येते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचा विचार समाजात रुजवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत राहिले. जीवनातील एक प्रसंग1965 ते70 च्या दरम्यान बोरगाव येथील सार्वजनिक पाणवठ्यावर मागासवर्गीय व्यक्तीने पाणी भरण्यास परवानगी नव्हती. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी स्वतः आडावर पाणी भरून नागरिकांना दिले यामुळे मनुवादी विचारांच्या लोकांनी कडाडूनविरोध केला होता. त्यावेळेस त्यां मनुवादयाकडून कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला होता तर खोट्या केस मध्ये अडकवून त्यांना घोड्यावर बसवून आलेल्या पोलिसाने खंडू गुरुजी यांना गावांमधून हातकडीत जखडून गावभर मिरवत तो पोलीस घोड्यावर अन गुरुजी अनवाणी हातकडीत जखडलेले त्याला दोरखंड बांधलेले ते दोरखंड त्याच्या हातात पूर्वीच्या काळी बोरगाव-भादा हा रस्ता पाणंद रस्ता होता. गुडघ्यापर्यंत चिखलात पाय रुतायचे पण हा सगळा प्रकार तोंडावर बोट ठेवून उघड्या डोळ्याने बघणारे भंडारे परिवारातील सर्व आणि इतर समाजातील आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक सह इतर समाजातील लोकांनी या घटनेचा विरोध कडाडून करण्याचे ठरविले आणि गुप्त बैठक झाली. शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा पद्धतीने आपल्या खंडु मास्तरला सोडवण्यासाठी आताच्या धनगर लवनामध्ये दडून बसले व तो पोलिस वाला मास्तरला घेऊन कधी भादा रस्त्याला परत जातो याची वाट पाहत दडून बसले होते त्या ठिकाणी घोड्यावरील पोलीस येताच सर्वांनी वेढा टाकून खंडु मास्तर ला सोडवलं होतं. हि चित्त थरारक प्रसंग अनेकांना अवगत आहेच,ते पोलिसाच्या तावडीतून सुटून लगेच खंडू गुरुजींनी मधल्या मार्गे चालत जाऊन लातूर गाठले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या दरबारात हजर राहिले व संबंधित पोलिस व मनुवाद्यांना त्यांनी कायद्याने धडा शिकविला आणि ती सामाजीक लढाई जिंकली. सार्वजनिक पानवठा गावातील गोरगरिबांसाठी खुला झाला. सर्वजण आनंदाने पाणी भरत होते आज ही या घटनेचे साक्षीदार गावामध्ये अनेक आहेत. त्यांच्या या क्रांतिकारी कार्याला आंबेडकरी चळवळीतील सच्चा देश भक्ताला मानाचा मुजरा,क्रांतिकारी जयभीम!

0 Comments