Latest News

6/recent/ticker-posts

रुग्णवाहिका हीच आशादायक आरोग्याची गुढी

 रुग्णवाहिका हीच आशादायक आरोग्याची गुढी


निलंगाः(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) माजी मंत्री व विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिकता लक्षाता घेत गुढीपाडवा दिनाचे औचित्य साधून 4 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज मंगळवारी दि.13 रोजी निलंगा येथे सौ.समिधा अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना आवश्यक सेवा मिळवून देण्यासाठी प्राण वाचवणारी तसेच तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकारी होणारी रुग्णवाहिका ही आजची गरज आहे.  4 रुग्णवाहिका पैकी 2 रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालय,निलंगा & 1 रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय, शिरूर आनंतपाळ आणि 1 रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र, साकोळ या शासकीय दवाखान्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लोकार्पण प्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष सौ.भारतबाई साळुंके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ.प्रल्हाद साळुंके, डॉ. दिनकर पाटील, निलंगाचे नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूराव राठोड, उपाध्यक्ष मनोज कोळ्ळे, नगरसेवक डॉ. किरण बाहेती, सभापती महादू फट्टे, नगरसेवक शंकरआप्पा बुरके, चेअरमन दगडू साळुंखे, शेषराव ममाळे, अरविंदजी चव्हाण ,प्रदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments