औसा शहरासह परिसरात अवकाळी पाऊस;शेतकऱ्याची उठली तारांबळ
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी-बी डी उबाळे)-सोमवार दि 12 एप्रिल 2021 रोजी दुपारी तीनच्या सुमारास औसा शहरासह परिसरातील कांही गावात विजेच्या कडकडाटासह गारांचा पावसाचा तडाखा बसला ढगांचा गडगडाट होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गाराने झोडपले. यामुळे शेतकऱ्याची मोठी तारांबळ उठली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील कडब्यांच्या गंजी उडून गेल्या वादळी पाऊस आणि गारा पडल्याने आंबा, डाळिंब,द्राक्ष बागा आणि भाजी पाल्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची चर्चा आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला वादळी पावसाने औसा शहराला झोडपले. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातील शेवटच्या टप्प्यात आलेल्या रब्बी पिकांची कापणी, मळणी अशा कामात व्यत्यय निर्माण झाला. दुपारी 3वा 30 मी च्या सुमारास मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडल्याने शेतावरील कामगारांची आणि शहरात गुढीपाडवा निमित्त खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची धावपळ उडाली गारांच्या पावसामुळे पत्र्यावर खडी पडण्यासारख्या अनुभव येत होता. तर घरातील अंगणात व रस्त्यावर गारांचा सडा पडल्याचे दिसून आल्याने औसा शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच गल्लीबोळातील रस्त्यावर पाणी वाहत होते हवामान खात्याने 10 ते15 एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे आणि शेतकरी वर्गाची धावपळ उडाली.सायंकाळी 7 वाजेपर्यंत तालुक्यात कुठेही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

0 Comments