Latest News

6/recent/ticker-posts

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा गुटख्याचा(पान मटेरियल)ट्रक झाला पलटी अनेकांनी धुवून घेतले हात

कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा गुटख्याचा(पान मटेरियल)ट्रक झाला पलटी अनेकांनी धुवून घेतले हात


बि जी शेख

औसा: दि.१२ - औसा. लॉक डाऊन होणार व चढ्या भावाने गुटखा विक्री होणार यासाठी महाराष्ट्रातील अनेक व्यापारी छुप्या मार्गाने कर्नाटका मधून गुटखा (पान मटेरियल) घेऊन येत असतात. मात्र आज औसा शहरांमध्ये कर्नाटका मधून येणारा ट्रक औसा हद्दीत येताच पलटी झाला आणि चोरी उघडकीस आली. हा माल येण्यासाठी बऱ्याच ठिकाणी हप्ता वसूल केला जात असल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली. महाराष्ट्रामध्ये गुटखा विक्रीवर बंदी असल्याने व याला खाणारा वर्ग याच भागात अधिक असल्याने चढ्या किमतीत तो विकला जातो. लाॅकडाउलच्या काळामध्ये हाच गुटखा तिप्पट-चौपट दराने विकला गेला होता.म्हणून अनेक व्यापारी हा माल या वेळेला स्टॉक करून विक्री करण्याचा बेत  असताना ट्रक पलटी झाल्याने चोरी समोर आली. पोलीस समोर असतानाही अनेकांनी या मालावर हात धुऊन घेतल्याचेही बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच औसाचे पी आय पटवारी साहेब घटनास्थळी पोहचुन शिल्लक होता तो  गुटखा हस्तगत करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया केली. ज्यांनी घटनास्थळी माल चोरून घेऊन गेला त्या सर्वांचा शोध घेऊन गुटखा जप्त करण्यात येईल असे पी आय साहेबांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments