Latest News

6/recent/ticker-posts

राज्यभरातील विधिज्ञ व कुटूंबियांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याची जिल्हा काँग्रेस विधि आघाडीची मागणी

राज्यभरातील विधिज्ञ व कुटूंबियांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याची जिल्हा काँग्रेस विधि आघाडीची मागणी


लातुर:{प्रतिनिधी} कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर व कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५ एप्रिल ते 30 एप्रिल २०२१पर्यंत लॉकडाऊन (संचारबंदी ) लागु करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालय, महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदी यंत्रणेच्या मदतीने ४५वर्षे वयोगटापुढील व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात आले आहे,येते आहे बहुतांश शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले आहे तर प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार आदीचे लसीकरण राबविण्यात येणार आहे पण न्यायालयीन कर्मचारी व न्यायालयीन कामकाजात सहभागी होणारे विधिज्ञ यांचे सरसकट लसीकरण झालेले नसल्याने अनेक जेष्ठ व तरुण विधिज्ञ व कुटूंबियातील सदस्याचे निधन झाले आहेत तर कोरोनाची लागण झाल्याने अनेक कुटूंब त्रस्त आहेत महत्वाचे म्हणजे दि १९.एप्रिल पासून काही प्रमाणात न्यायालयीन कामकाजास सुरुवात होते आहे त्यामुळे थोडीफार वर्दळ होणारच आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने राज्यभरातील विधिज्ञ व कुटूंबियासाठी लसीकरण मोहीम लवकरात लवकर राबविण्यात यावी निवेदनाद्वारे ही मागणी लातुर जिल्हाचे पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांना लातुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड प्रदिपसिंह गंगणे,अँड रामेश्वर चव्हाण, अँड अन्सार शेख, अँड शिवकुमार क्षीरसागर, अँकिशोर सूर्यवंशी, अँड सज्जाद शेख, अँड अजित चिखलीकर, अँड सुनीत खंडागळे, अँड सचिन शिंदे, अँड सुहास बेंद्रे, अँड अरविंद देशमुख, अँड अक्षय शिंदे,अँड सुनंदा इंगले,अँड छाया मलवाडे आदींनी केली आहे तर निवेदनाची एक प्रत अँड अण्णाराव पाटील, सदस्य महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, मुंबई, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापौर, उपमहापौर, सभापती स्थायी समिती महानगरपालिका लातुर यांना पाठवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments