Latest News

6/recent/ticker-posts

निटुर ते ताजपूर पाटी पूर्ण झालेल्या महामार्गाच्या तांत्रिक कामास झाली सुरुवात

निटुर ते ताजपूर पाटी पूर्ण झालेल्या महामार्गाच्या तांत्रिक कामास झाली सुरुवात


निटुर:{प्रतिनिधी} निलंगा तालुक्यातील निटुर ते ताजपुर येथून जात असलेला महामार्ग जहिराबाद ते लातूर हे पूर्ण होऊन काही दिवस झाले असले तरी सध्या तांत्रिक भाग म्हणून नवीन कच्चा रोडचे मशीन द्वारे रोड कट केली जात आहे. तांत्रिक आखणी आखून योग्य अंतरावर मशीन द्वारे रोड कट केली जात आहे यामुळे रोडला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आज दिवसभर दोन ते तीन मशीनच्या साह्याने निटुर येथील तयार झालेला रस्त्याचे मशीन द्वारे रस्ता कट करून तांत्रिक काम करताना चित्र पहावयास मिळाले एकंदरीत निलंगा तालुक्यातील गावात असलेला महामार्ग जवळ जवळ पूर्ण अवस्थेत झाला असून शेवटची लहान-लहान कामे आणखी शिल्लक आहेत सिमेंट रस्ता बनवून तयार झाल्यानंतर मशीनच्या द्वारे तो कट केला जातो व त्याच्या मध्ये केमिकल च्या साह्याने स्पंच पाईप घातली जाते यामुळे रोडची सुरक्षा व आयुष्य वाढते.



Post a Comment

0 Comments