Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना व संचार बंदीमुळे केळगाव येथील हंबीरबाबाची यात्रा रद्द;ग्रामपंचायतीने दिली गावात दवंडी

कोरोना व संचार बंदीमुळे केळगाव येथील हंबीरबाबाची यात्रा रद्द;ग्रामपंचायतीने दिली गावात दवंडी


केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील हंबीर बाबा व बकाशवली यांची यात्रा कोविड-19, संचार बंदी मुळे रद्द करण्यात आली आहे. तशी ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावांमध्ये हलकी वाजून दवंडी देण्यात आली आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर सातव्या  दिवशी म्हणजे येत्या सोमवारची केळगाव येथील ग्रामदैवत बाबा हंबीर यांची यात्रा भरते व आठव्या दिवशी येथीलच  बकाशवली यांची यात्रा भरते यात्रेला गावकरी व परिसरातील अनेक खेड्याचे,लोक मोठ्या उत्साहाने येतात परंतु सध्या कोरोना ची सावट असल्यामुळे सध्या संचारबंदी मुळे ग्रामपंचायतीच्या वतीने तशी गावकऱ्यांना संपूर्ण गावांमध्ये हलकी द्वारे दवंडी देण्यात आली सदर यात्रा रद्द करण्यात आली आहे यामुळे गावकऱ्यांनी यात्रेला येऊ नये गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments