तहसीलदार व पोलीस प्रशासनाने पकडली अवैध रित्या विक्री होणारी दारू
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी जाहीर केली आहे. त्यातच लातूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील बार व रेस्टारंटही बंद करून दारू विक्री थांबवली असून तरीही निलंगा शहर व तालुक्यात संचारबंदी काळात चढ्या भावाने राजरोसपणे देशी व विदेशी दारू विक्री सुरू आहे. निलंगा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर भागात सतिश निळकंठ सगर व सुभाष लक्ष्मण जाधव हे दोघे आपल्या राहत्या घरी अवैध देशी दारु विक्री करत असल्याची माहिती तहसिलदार गणेश जाधव यांना मिळताच तहसीलदारांनी त्वरीत पोलिस ठाण्याला कळवून त्यांनी तात्काळ ताफा घेऊन जाऊन अवैधरित्या देशी दारु विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीच्या घरावर धाड टाकून 451 बाटल्या { नऊ बाॕक्स देशी दारू } ताब्यात घेतली आहे.सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रणिता गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन दोन्ही आरोपीवर अवैध दारु विक्री करणे व बाळगणे अंतर्गत निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता गायकवाड व पोलिस शिपाई प्रणव काळे करत आहेत.

0 Comments