Latest News

6/recent/ticker-posts

मांडूळ जातीच्या सापांला जीवदान;ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन च्या सदस्यांची कामगीरी

मांडूळ जातीच्या सापांला जीवदान;ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन च्या सदस्यांची कामगीरी


लातूर:(प्रतिनिधी) दि. 16 एप्रिल रोजी हरंगूळ येथील सोमनाथ स्वामी व अंबेजोगाई येथ सचिन कराड यांच्या घरी साप निघाल्याची माहिती लातूर येथील ऑर्गनायझेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कंझर्वेशन चे अध्यक्ष सिद्धार्थ चव्हाण यांना मिळाली त्यांनी तात्काळ आपले सहकारी पवन कराड, राघवेंद्र चव्हाण, वाजीद शेख याना घेऊन घटनास्थळी भेट दिली असता मांडुळ साप दिसले.  हे दोन्ही सापांना सुखरूप रित्या पकडले सदर साप हे मांडूळ  (Red Sand Boa) प्रजातीचे असल्याची माहिती यावेळी स्थानिकांना दिली व वाचलेल्या सापांची नोंद वनविभागाच्या कार्यालयात करून  वन अधिकारी महेश पवार मुकेश नरवडे व सतीश कांबळे यांच्या उपस्थितीत दोन्ही सापांना निसर्गमुक्त करण्यात आले. वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत या सापांना संरक्षण मिळूनही  लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमजुती, अज्ञान व अंधश्रद्धेमुळे या सापांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. तस्करी व अनेक वर्ष डांबुन ठेवल्यामुळे या प्रजातीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, मांडूळ हा साप जमिनीखाली राहून उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेऊन शेतकऱ्यांची मदत करत असतो. लातूर परिसरात साप किंवा इतर जखमी वन्यजीव आढळल्यास त्वरित वनविभागाच्या अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधान्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments