Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना संकट काळात लढणारा निर्भय योद्धा अनिल चव्हाण

कोरोना संकट काळात लढणारा निर्भय योद्धा अनिल चव्हाण


संपूर्ण जग मागील वर्षभरापासून कोरोना या महामारीने त्रस्त आहे. तीच कोरोना संकटाची लाट आता आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे. चाकूर तालुक्यातील नळेगाव सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे प्रत्येकजण आपापल्या परीने या संकटाशी लढत आहे काळजी घेत आहे. पण या सर्वांमध्ये एक अवलिया असा आहे की जो गेल्या वर्षांपासून सतत रस्त्यावर आहे. प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन धावून जात आहेत सर्वांसाठी जीवाची पर्वा न करता लढत आहेत. ग्राम पंचायत सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य अशी अनेक नावामागे असली तरी समाजसेवा हे एकच ध्येय समोर ठेऊन वागणारा हा योद्धा म्हणजे अनिल चव्हाण रक्तदान शिबिर, वैकुंठरथ या सारखे अनेक समाजपयोगी उपक्रम अनिल चव्हाण सातत्याने राबवत असतात. पण या कोरोना काळात करत असलेल्या त्यांच्या कार्याची उंची व किंमत अनमोल आहे. कारण या काळात स्वतःच्या कुटुंबातील मृतदेह स्वीकारायला सुद्धा लोक घाबरत असताना अनिल चव्हाण मात्र प्रत्येक ठिकाणी धावून जात आहेत. अगदी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अँटी कोरोना फोर्स टीमची स्थापना करण्यात पुढाकार घेऊन रात्रंदिवस त्यांच्या समवेत राहून प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला. संपूर्ण गावात प्रत्येक व्यक्तीला स्वखर्चाने मास्कच व आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप केले. या कामी मदत करणाऱ्या प्रत्येक मित्रांच्या आरोग्याची काळजी सातत्याने ते घेत आहेत सोशल डिस्टन्स,सॅनिटायझिंग इत्यादी बाबत सतत सर्वांचे समुपदेशन करत आहेत. प्रशासकीय पातळीवरून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. प्रत्येकांनी एवढी काळजी घेऊनही कोरोनाने घात केलाच.नळेगावात अल्प काळातच कोरोनाचा राक्षसी विळखा पाडला.एकामागून एक कोरोना बाधित रुग्ण वाढू लागले व अत्यंत संपर्कातील लोकांना स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली.कोरोना बाधित रुग्णांना चाकूर येथे पाठवणं सुरु झाल.अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येने शासकीय यंत्रणेचीही धावपळ उडाली. यावेळी डगमगून न जाता नळेगावहुन अगदी लहानसहान वस्तूपासून ते प्रसंगी जेवणाच्या डब्यापर्यन्तची सोय अनिल चव्हाण व त्यांच्या मित्र मंडळींनी केली.वारंवार या बांधवांच्या संपर्कात राहून हिंमत दिली हे बांधव घरी परत येईपर्यन्त त्यांची काळजी ते घेत आहेत इकडे गावातही कोरोना रुग्ण वाढतच होते बाधित रुग्णाच्या कुटुंबियांना व शेजाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यातून सुद्धा अनिल चव्हाण यांनी मार्ग काढला मित्रांच्या सहकार्याने या सर्व बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचा व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा चालू केला यावेळी त्यांनी कोरोनाची मला लागण होईल का ? मी संपर्कात कस जाऊ ? असा विचार केला नाही तर उलट आज माझ्या नळेगावकर बांधवाना मदत व मानसिक आधाराची खरी गरज आहे हे ओळखून चोवीस तास हा लढवय्या फिरत होता दुकाने बंद करून तर कुणी घराचे दरवाजे बंद करून स्वतः व कुटुंबियांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत असताना हा ध्येयवेडा मात्र नळेगाव हेच माझे कुटुंब व नळेगावकर हेच माझे कुटुंबीय म्हणून सर्वांसाठी अभिमन्यूप्रमाणे हिमतीने निकराची लढाई लढत आहे त्यांची धडपड पाहून अनिल चव्हाण सारख्या अश्या लढाऊ बाणा असणाऱ्या या समाजसैनिकास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!!!

इतरांसाठी सदैव झिजणं...!

याचच तर नाव खर जगणं...!!

-बाळासाहेब बरचे

Post a Comment

0 Comments