Latest News

6/recent/ticker-posts

परमिट च्या नावाखाली शिरोळ वांजरवाडा येथील वीजपुरवठा तासन-तास खंडित

परमिट च्या नावाखाली शिरोळ वांजरवाडा येथील वीजपुरवठा तासन-तास खंडित


शिरोळ वांजरवाडा:( प्रतिनिधी/सलीम पठाण) निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा परिसरामध्ये विद्युत महावितरण उपकेंद्र अंबुलगा 33 केव्ही यांच्याकडून परमिट च्या नावाखाली उन्हाळ्यामध्ये दररोज दिवसभर 4 ते 5 तास विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे यामुळे उन्हाळ्याच्या उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. एप्रिल चा महिना सुरू आहे तापमानाचा पारा 40 अंशावर गेला आहे. उन्हामुळे उकाडा जाणवत आहे. विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे कुलर पंखे हे सगळेच बंद आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अंबुलगा महावितरण उपकेंद्रा कडून फॉल्ट काढण्याच्या नावाखाली कधी शिरोळ वांजरवाडा ची लाईन मॅन तर कधी शिरूरचे लाईन मेन लाईट परमिट घेतात पावसाळ्यात वीज पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून उन्हाळ्यात वीज गुल असा महावितरणचा कारभार यांच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना उन्हाच्या झळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने वेळीच लक्ष देऊन या कारभारावर वेळीच उपाययोजना करावी व योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थ यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंबुलगा महावितरण उपकेंद्र अंतर्गत येणारे गावकऱ्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments