प्रा. मिरगाळे यांच्या प्रयत्नाला यश;ननंद येते लसीकरनास प्रारंभ
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे ननंद येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ननंद येथे कोविड लसीकरनास आज प्रारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पारगे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास कदम यांच्यासोबत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी सतत पाठपुरावा करून मोजे ननंद येथे कोविड लसीकरण सुरू करण्यास मान्यता घेतली. त्यामुळे आज ननंद येथे शंभर लोकानी कोवीडची लस टोचून घेतली. गावामध्ये 45 वर्षाच्या वरील जवळपास दोन हजार व्यक्ती आहेत. त्यांना पण टप्प्याटप्प्याने लस दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.गिर्जी सर,प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख लातूर, सरपंच हरीदास बोळे, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी, ग्रामसेवक भोसले सर, वैजनाथ लादे, मोहन पाटील, शरद मिरगाळे, हाशिम पटेल ज्ञानेश्वर बेलकुंदे आदी जण उपस्थित होते.
0 Comments