Latest News

6/recent/ticker-posts

औसा पालिकेकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कोरोना चाचणी ची कार्यवाही

औसा पालिकेकडून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कोरोना चाचणी ची कार्यवाही


शेख बी जी/बी डी उबाळे

औसा: दि. 22 - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुरुवार दि 22 एप्रिल 2021 पासून राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. औसा शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महसूल,नगर परिषद,आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी प्रशासनाने वारंवार नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये अशी विनंती करूनही नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाने रॅपिड एंटीजन टेस्टचे किट सोबत घेऊन आता विनाकारण घराबाहेर फिरणा-यांची कोरोना चाचणी करायला सुरुवात केली आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनातील सर्व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असताना हलगर्जीपणा करीत हकनाक घराबाहेर व सार्वजनिक रस्त्यावर फिरणाऱ्याची कोरोना चाचणी करण्याची धडक मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असून कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जनतेनी विनाकारण घराबाहेर पडू नये. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सर्व नागरिकांना औसा प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments