Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना महामारी मध्ये ही चाकूर तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत,मनसेचा आंदोलनांचा इशारा

कोरोना महामारी मध्ये ही चाकूर तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत,मनसेचा आंदोलनांचा इशारा


मुख्य कार्यकारी अधिकार लातुर,यांच्याकडे निवेदन देऊन मनसेची मागणी

चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} कोरोना महामारी मध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे.प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी अनेक कठोर पावले उचलत आहे.चाकूर पंचायत समितीतील ५५ ग्रामसेवक आहेत.ही ५५ ग्रामसेवक बाहेर तालुक्यातून दररोज अप - डाऊन करत आहेत.मुख्यालयी एकसुध्दा ग्रामसेवक राहत नाही.शासनाने जारी केलले आदेश गावपातळीवर राबविले जात नाही. त्यातून कोरोनाचा भडका उडत आहे.याचे ज्वलंत उदाहरण चाकूर तालुका मधील  लिंबालावाडी हे गाव आहे.या गावात ग्रामसेवक राहत नाही.गावात सप्ताह झाला.त्यातून कोरोनाची लागन गावकऱ्यांना झाली.त्यात १८८ जण कोरोना बाधित सापडले. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे विरुध्द कर्तव्यात कसूर केले म्हणून गुन्हे दाखल करावीत.गावात ग्रामसेवक मुख्यालयी असते तर वेळीच शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली असती.सप्ताह झाला नसता. ग्रामसेवक हे तालुका प्रशासनाला याची माहिती देऊन वेळीच यावर आळा बसला असता.ही भीषण परिस्थिती तिथे निर्माण झाली नसती.परंतु हे तालुक्यातील ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत.त्यांना मुख्यालयी राहण्याचे घरभाडे शासन दरमहा पगारात देत असते. घरभाडे उचलून देखिल ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. मुख्यालयी न राहता हे शासनाकडून घरभाडे उचलतात.शासनाची फसवणूक करत आहेत. ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांनी मुख्यालयी राहिले पाहिजेत.असे ग्रामविकास विभागाने ९ सप्टेंबर २०१९ रोजी आदेश दिलेआहेत. मनसेच्या वतीने तत्कालीन गटविकास अधिकारी गोस्वामी यांना निवेदन दिले होते. त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती.पण दुदैवाने त्यांची बदली झाली.खालील मागण्या आम्ही मांडत आहोत.त्या येत्या १ मे २०२१ पर्यंत सोडवावे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने चाकूर पंचायत समितीला २ मे २०२१ रोजी टाळे ठोकणार आहोत.या परिस्थितीला आपण जबाबदार रहाल. याची नोंद घ्यावी. मागण्या  १ ) लिंबाळवाडी घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केले यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करावीत.दोषीना पाठीशी घालणारे अधिकारी यांना सहआरोपी करण्यात यावे. २ ) जे ग्रामसेवक घरभाडे उचलून मुख्यालयी राहत नाहीत.त्यांनी शासनाची फसवणूक केली.त्यांचे  विरुध्द शासनाची फसवणूक केली.म्हणून भादवि ४२० कलम अन्वये गुन्हे दाखल करावीत. ३ ) मुख्यालयी राहत नसलेले ग्रामसेवक यांचेकडून घरभाडेची रक्कम वसूल करावी.ती शासन तिजोरीत जमा करावी. ४ ) सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ द्यावेत.जे मुख्यालयी राहत नाहीत.त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. ५ ) ग्रामविकास विभाग यांचे आदेशाचे पालन तंतोतंतपणे करण्यात यावे. या मागण्या पूर्ण करावे.अन्यथा २ मे २०२१ रोजी चाकूर पंचायत समितीला टाळे ठोकणार असा इशारा दिला आहे. या निवेदनावर डॉ. नरसिंह भिकाणे,जिल्हाध्यक्ष मनसे लातूर,निरंजन रेड्डी,तालुकाध्यक्ष मनसे चाकूर, सूर्यकांत शेवाळे,कृषि तालुकाध्यक्ष चाकूर,तुळशीदास माने,मारुती पाटील,ओंकार शेटे,दत्ता सूर्यवंशी, कृष्णा गिरी, नारायण पस्तापुरे, राहुल आरदवाड आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments