Latest News

6/recent/ticker-posts

बँका बंद असल्याने ग्राहक सेवा केंद्रावर सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा

बँका बंद असल्याने ग्राहक सेवा केंद्रावर  सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा


निलंगा:(तालुका प्रतिनिधी /इरफान शेख) आज शहरातील सर्वच बँकांना सुट्टी असल्यामुळे ग्राहक सेवा केंद्रामध्ये नागरिकांना पैशाचे व्यवहार करण्यासाठी मोठी गर्दी केली त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन झाले. निलंगा शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत तर आहेच मूर्त्युचे प्रमाण पण वाढत आहे मागील 3 दिवसात 17 जणांचा मूर्त्यु झाला आहे. यामुळे  प्रशासन नागरिकांना प्रतिबंध उपाय व उपायोजना करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करत आहे तरीसुद्धा नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे आज बुधवारी बँकांना सुट्टी असल्यामुळे पैशाचे व्यवहार करण्यासाठी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत नागरिकांनी शहरातील ग्राहक सेवा केंद्रावर आपले पैशाचे व्यवहार करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ग्राहक सोशल अंतर चा वापर करत नव्हते व मोठी गर्दी केल्याने परत प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. नागरिकांनी आपली व आपल्या कुटूंबनाची काळजी घेण्याची गरज आहे व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे

Post a Comment

0 Comments