निटूर येथे शॉटसर्किटमुळे आग लागून फुटवेरचे दुकान जळाले
निटूर: निलंगा तालुक्यातील निटूर येथील बसस्थानकाजवळ बालाजी विठ्ठल पारधे रा.निटूर यांचे फुटवेरचे दुकान आहे. या दुकानाच्यावरून 33/11 महावितरण उपकेंद्र विद्युत पुरवठ्याच्या तारा गेलेल्या आहेत विद्युत ताराचे (घर्षण) शॉटसर्किटमुळे आग लागून फुटवेरचे दुकान जळाले आग लागून विद्युत तारांच्या खाली असलेले दुकानाला आग लागून दुकानातील चप्पल बूट सह फुटवेर व इतर दुकानातील साहित्य असे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. सदरील दुकान मालकाने निटुर पोलीस चौकी व तहसीलदार यांचेकडे तक्रार दाखल केलेली आहे. तलाठी आर.बी. कुलकर्णी यांनी पंचनामा करून निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांचेकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस आमलदार सत्यवान कांबळे करीत आहेत. सदरील नुकसान झालेल्या दुकानदारास महावितरणकडून भरपाई मिळावी अशी मागणी होत.
0 Comments