Latest News

6/recent/ticker-posts

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वाचले चार रुग्णांचे प्राण;कोरोना लढ्यातील देवदूत डॉ. शेख,डॉ. रावते यांच्या कार्याला सलाम

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे वाचले चार रुग्णांचे प्राण;कोरोना लढ्यातील देवदूत डॉ. शेख,डॉ. रावते यांच्या कार्याला सलाम


शेख बी जी

औसा: दि.२५ - सर्वानी वेळेवर प्रतिसाद दिला, प्रयत्न केले आणि त्या 4 कोरोना पॉजिटिव रुग्णांचा जीव वाचला. रात्री एक वाजुन पाच मिनिटाला सी सी सी औसा येथे रात्रपाळी वर असलेले सी एच ओ डॉ. सुनील रावते यांचा दबक्या आवाजात कॉल आला. सर चार पेशंट 02 वर आहेत आणि सर्वांचे SPO2 ऑक्सीजन काढल्यावर 60 ते 70 च्या दरम्यान रेकॉर्ड होत आहेत आणि एक तासात सर्व लहान 02 सिलेंडर्स रिकामे होतील. जंबो सिलेंडर लागेल आर एच औसा आणि डीसीएचसी लातुर येथे बेड रिकामे नाहीत. सर्व चार रुगणांच्या जीवाला धोका होऊ शकतो. मन्न सुन्न झाले 2 मिनिट काय करावे सूचले नाही. मग डॉ. शेख यांनी सुरु केले युद्ध पातळीवर प्रयत्न 02 सिलेंडर्स साठी पहीला कॉल डॉ. सानपला लवकर सी सी सी औसा येथे पोहोचा आणि डॉ. रावतेला मद्त करा हो सर निघतो लगेच दूसरा काॅल डॉ रणदिवे सरना एक जम्बो 02 सिलेंडर सी सी सी ला मिळेल का ? हो सर लगेच पाठवतो. तो पर्यन्त डॉ रावते स्वता: गाड़ी घेऊन आर एच औसा येथे बेड मिळते का बघन्यासाठी आणि सिलेंडर घेऊन येण्यासाठी तीसरा कॉल डॉ. सानपला सी सी सी लामजना येथून पी एच सी च्या अँब्युलन्स मधे 2 ते 3 02 सिलेंडर औसा सी सी सी ला पाठवून दया हो सर. चौथा कॉल डॉ. चेतनला 2 सिलेंडर औसा CCC ला पाठवून द्या हो सर पण ऍम्ब्युलन्स खराब आहे. बघतो काही तरी करतो सर पाचवा काॅल Phc  मातोळा येथील एच ए जाधव यांना 1 ऑक्सीजन सिलेंडर तुमच्या पी एच सी चा आणि 2 बेलकुंड पी एच सी चे औसा सीसीसी येथे घेवून येण्यासाठी चालकाला सांगा "हो सर लगेच सांगतो.".सहावा कॉल भादा पी एच सी एफ पी कांबळेना. नेहमीच्या हावभाव मधे निवांत.. हां बोला सर एवढ्या रात्री फ़ोन केलो.. ते सोडून तुम्ही लवकर दोन सिलेंडर घेऊन सी सी सी औसा येथे येण्यासाठी चालकाला ला सांगा.हो सर..सर्वांकडुन चांगली प्रतिक्रिया मिळाली आणि सर्वांचे कॉल आले सर आपण संगीतल्या नुसार 02 सिलेंडर CCC औसा येथे पाठविले आहेत. CCC औसा येथून 1:50 वाजता अरबाज चा कॉल.. सर 1 जम्बो आणि नऊ छोटे दोन सिलेंडर सी सी सी औसा येथे पोहोचले आहेत आणि आता चिंता मीटली आहे..जीव भांडयात पडला..परत पहाटे 5:30 ला phc hasegaon येथील गिरी महाराजना  कॉल केला.. महाराज दोन सिलेंडर औसा सी सी सी ला पाठवा.10 मिनीटात महाराज चा कॉल..सर Cylinders औसा ccc ला पाठविले..पहाटे 5:45 ला डॉ अनिल चा काॅल रहीम सर्व पेशंट स्टेबल  आहेत एक पेशंट थोड़ा टॉक्सिस आहे..निवांत रहा. संपूर्ण रात्र चाललेल्या या थरारात या डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीची कौतुक केले जाईल तितके कमी आहे.

Post a Comment

0 Comments