Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना संकटकाळात शिधापत्रिकाधारकांना तात्काळ मोफत अन्य धान्य वाटपाचा निर्णय

कोरोना संकटकाळात शिधापत्रिकाधारकांना तात्काळ मोफत अन्य धान्य वाटपाचा निर्णय 


बी डी उबाळे

औसा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यांना एप्रिल व मे या दोन महिन्यासाठी मोफत गहू तांदूळ देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री व राज्याच्या राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाने सध्या टाळेबंदी वर रात्रीची संचारबंदी काळात नागरिकांचे अन्नधान्य वाचून हाल होऊ नये आणि भूख बळी जाऊ नये म्हणून मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ देण्यात येतात. राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना टाळेबंदी काळात दोन महिन्याचे अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना पूर्वी मासिक अन्नधान्य नेतनाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या परिमाणानुसार अन्नधान्याचे वाटप करावे.रास्त धान्य दुकानात धान्य खरेदी करण्यासाठी लाभार्थी गेल्यास अंत्योदय योजनेतील लाभधारकांना प्रति शिधापत्रिका पस्तीस किलो व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य मोफत देण्यात यावे अशा आशयाचे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. मशीनवर खरेदी करावयाचे व मोफत अन्नधान्य एकत्रित वितरित करण्यासाठी रास्त भाव दुकान चालकांनी काळजी घ्यावी व पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण तात्काळ करावे असा आदेश हेमंत वाडीकर कक्ष अधिकारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन केले आहे.

Post a Comment

0 Comments