त्या नराधमास त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा द्या - विविध सामाजिक संघटनांची मागणी
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती,ऑल इंडिया पँथर सेना, शहीद टिपू सुलतान संघटना,जाकीर सामाजिक विकास संस्था,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेमार्फत निवेदन देवून मागणी करण्यात आली आहे की मौजे शेडोळ ता.निलंगा येथील घटना दि 06 एप्रिल 2021 रोजी घटली असून अद्याप आरोपीस अटक झाली नाही . त्यास त्वरीत अटक करुन फाशी देण्यात यावी व पिडीत मुलीला शासनाकडून 10 लाख रु आर्थिक मदत करण्यात यावी . सोबतच पिडीतेला व त्याच्या कुटूंबाला जिवाचा धोका असल्याने सरंक्षण देण्यात यावे. या घटनेमुळे झालेल्या नुकसानाची तर भरपाई होवू शकत नाही .पण सदरील पिडीतेला तिच्या भविष्यासाठी शासकीय नौकरीची तरतूद करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की संघटनेच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून पिडीतेला न्याय दयावा अथवा नाविलाज कोवीडचे सर्व बंधने जुगारुन तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यास जबाबदार सर्व प्रशासन राहिल याची नोंद घ्यावी असा उल्लेख केला आहे. निवेदनावर राधा कर्मवीर कुशल,विशाखा हातागळे, मुजीब सौदागर, मेघराज जेवळीकर,जाकीर शेख,सबदर कादरी,मिथुन जाधव,गणेश पेठकर, आकाश पेठकर,महेश ढगे,राहुल पोतदार, ऋषीकेश पोतदार आदीं जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 Comments