Latest News

6/recent/ticker-posts

'ओली' पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी;चाकुर शहरातील नगरिकांचे निवेदनाद्वारे मागणी

'ओली' पार्टी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी;चाकुर शहरातील नगरिकांचे निवेदनाद्वारे मागणी 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर नगरपंयातीमध्ये कांही नागरिक शहरातील पाणी पुरवठा समस्या घेऊन जातात.त्यावेळी कर्मचारी नगरपंचायती मध्ये उपस्थित राहत नाहीत.येथील नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागातील कांही अधिकारी  व कर्मचारी एका हॉटेल मध्ये ओली पार्टी करताना आढळुन येतात.शहरातील नागरिक दुपारी त्या हॉटेलकडे जाऊन त्यांना हॉटेलात मटन पार्टी,दारु पित असताना आढळून येतात.अजय धनेश्वर,खालेद हरणमारे,अजित घंटेवाड,लक्ष्मण धोंडगे,हे नागरिक हॉटेलात जातात तर  त्याठिकाणी स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड,दिवाबत्तीचे कर्मचारी मुंकुद मस्के,क्लार्क व्यंकट सुर्यंवशी,स्वच्छता व घनकचरा यावर नियंञण प्रमुख सचिन होळंब हे चाकुर शहरातील एका हॉटेल मालकांस हॉटेल खोलण्यास भाग पाडले.ही सर्व मंडळी आतील खोलीत ओली पार्टी करीत होते.हॉटेलच्या आतील खोलीत मटणांवर ताव मारत होते.त्यांच्या बाजुस दारुच्या बाटल्या होत्या,आम्हाला पाहुन आम्हासही जेवण करा म्हणाले.आम्ही व्हीडीओ शुटींग केली. कोरोना सारख्या महामारीच्या संकटाच्या काळात संचारबंदी असताना.त्यावर नगरपंचायत चाकुर मधील कर्मचारी व अधिकारी बिनधास्तपणे हॉटेलवर पार्टी करीत होते.शहरात चालु दुकानावर कारवाई केली जाते.त्या पथकात हे सर्व कर्मचारी आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचारी या घटनेस जबाबदार धरुन निलंबित करावे.त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करावे अशा मागणीचे निवेदन दिले आहेत.निवेदनांवर अजय धनेश्वर,लक्ष्मण धोंडगे,खालेद हरणमारे,अजित घंटेवाड,यांचा स्वाक्षरी आहेत.

कालचा घडलेला प्रकार निदनिंय आहे.काल झालेल्या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करुन त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल.संबंधितांना नोटीस देण्यात येईल आणि पुढील कारवाई केली जाईल- अजिंक्य रणदिवे,मुख्याधिकारी नगरपंचायत चाकुर

Post a Comment

0 Comments