लिंबाळवाडी गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी-डॉ.शिवानंद बिडवे,तहसिलदार चाकुर
चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} सध्या कोरोनांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चाकुर तालुक्यात दर दिवसागणिक बांधितांचा आकडा वाढतच आहे. प्रशासनाच्या वतीने शर्तीचे प्रयत्न चालु आहेत. गावातील नागरिकांनी देखील दक्ष राहुन आपले व आपल्या परिवारांचे या रोगापासुन संरक्षण करावे. विनाकारण घराबाहेर पडुन नका सर्वांनी आपल्या शरीरात लक्षण दिसताच कोरोना टेस्ट करून घ्यावी व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.अशी सुचना लिंबाळवाडी येथे डॉ.शिवानंद बिडवे यांनी दिली. आज मौजे लिंबाळवाडी येथे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे गटविकास अधिकारी लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ, तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती पंडगे अर्चना, नळेगाव गणाच्या जिल्हा परिषद सदस्या वर्षा अर्जुने, ओम टकटवळे, यांनी गावातील ग्रामसेवक, तलाठी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, प्राथमिक शिक्षक गावात सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येबाबत गावात अतिदक्षता घेण्याच्या सूचना दिल्या, गावातील प्रत्येक व्यक्तीची जवळपास 800 लोकसंख्येची अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे, पॉझिटिव्ह रुग्णांना चाकूर येथील कोरोना केअर केंद्रात उपचार केले जाणार आहेत तर कमी वयाच्या व कमी धोका असणाऱ्या रुग्णांना होम क्वारंटाईन करून उपचार केले जाणार आहेत. पुढील 8 दिवस गावातील कोणीही अतिआवश्यक कामाशिवाय गावाबाहेर जाणार नाही याबाबत गावकऱ्यांनी दक्षता घ्यावी अश्या सूचना देण्यात आल्या. गावात सध्या तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वाधिक कोरोना बांधित रुग्ण संख्या गावात आहे. लिंबाडवाडी गावात लोकसंख्या 800 आसुन जवळपास 50 पेक्षा जास्त कोरोना बांधित रुग्ण आहेत. गावातील 500 लोकांची कोरोना तपासणी शिल्लक आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना रुग्ण संख्या कमी व्हावी म्हणून गावातील नागरिकांनी दक्ष राहावे असे आहवान डॉ.शिवानंद बिडवे यांनी केले आहे. मास्क वापरा,सामाजिक अंतर ठेवा,साबणाने सतत हात धुवावे,लस घेण्यासाठी अॉनलाईन नोंदणी करावी. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे.

0 Comments