Latest News

6/recent/ticker-posts

अमिन धानुरे यांचा उत्कृष्ट बँक मित्र म्हणून सत्कार

अमिन धानुरे यांचा उत्कृष्ट बँक मित्र म्हणून सत्कार


नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) दि. 8 - चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया साठी बँक मित्र तथा सी एस पी म्हणून सेवा देणारे आमिन धानुरे यांना उत्कृष्ट बँक मित्र म्हणून  गौरविण्यात आले. यावेळी त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी लातूरचे आर बी ओ किशोर वहाने  यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नळेगाव शाखेचे व्यवस्थापक राहुल चिकुर्डेकर, फिल्ड ऑफिसर कृष्णा चौरसिया, कॅशियर मोहनीश गोंडुळे, फुलचंद येळनुरे, मोहन सगर, आसिफ मचकुरी, समीर शेख, मेहबूब धानुरे, अफरोज धानुरे आदी मान्यवर उपस्थित होते. आमिन धानुरे यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलेली उत्कृष्ट सेवा, तसेच बँकेचे  काटेकोर पणे केलेले कार्य, त्यांनी बँकेला केलेले बँकेच्या कार्यातील महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांना उत्कृष्ट बँक मित्र म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. अत्यंत मनमिळाऊ आणि सुस्वभावी असणारे हे व्यक्तिमत्व सर्वांनाच उत्कृष्ट सेवा देतात. त्यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments