संभाजी ब्रिगेडने घेतली शेडोळ येथील पीडित कुटुंबाची भेट
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) शेडोळ येथील पीडित कुटुंबाला जिल्हा उप रुग्णालय येथे भेटून मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड यांनी घडलेल्या घटनेविषयी तीव्र निषेध व्यक्त करून कुटूंबियांना धीर व मानसिक आधार दिला. निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील 7 वर्षाच्या चिमुकलीवर गावातील एका इसमाने अमानवी कृत्य करून एका मुलीचे व तिच्या कुटूंबियाचे जीवन उध्वस्थ केले आहे त्याला पकडून फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नावडे, कार्याध्यक्ष जाधव एम.एम, तालुकाध्यक्ष डॉ.हंसराज भोसले, संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी समाधानताई माने ,शिवमती आम्रपाली सुरवसे, शिवमती रंजनाताई, शिवमती सोनालिताई, गोविंद काळे, सुरवसे, बीबीशन चव्हाण, डॉ. उमाकांत जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments