Latest News

6/recent/ticker-posts

शेडोळ येथील चिमुरडीवर अत्याचार करणार्‍या नराधमास पकडून तात्काळ पीडितेला न्याय द्यावा-लहुजी शक्ती सेना

शेडोळ येथील चिमुरडीवर अत्याचार करणार्‍या नराधमास पकडून तात्काळ पीडितेला न्याय द्यावा-लहुजी शक्ती सेना


निलंगा:(तालुका प्रतिनिधी इरफान शेख) तालुक्यातील शेडोळ येथील सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या फरार असलेल्या नराधमास पकडून तात्काळ शिक्षा देऊन पीडितस न्याय द्यावा असे निवेदन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांना देण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमातीतील स्त्रिया व बालके सुरक्षित नाहीत या जाती जमाती मधील होत असलेले अन्यायाची दखल राज्य शासनाने घेऊन अनुसूचित जाती जमाती कायदा अधिक मजबूत करावा, शेडोळ येथील फरार आरोपी वर तात्काळ अटक करावी या झालेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना लातूर संघटनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. व त्या कुटुंबीयांना न्याय द्यावा असे संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी,जिल्हाध्यक्ष ओम शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश लोंढे, यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments